पान-२ मेन आहे.
---------
कोट येणार आहे.
----------------
SNR26B23078
सिन्नर ः बसस्थानकात रेलिंग लावण्यासाठी तयार केलेले खड्डे.
-------------
४०-५
सिन्नर बसस्थानकात खड्ड्यांचे दुखणे
-------------
रेलिंगसाठी पंधरा दिवसांपासून खोदून पडून ः अपघात होऊन जायबंदीची शक्यता
--------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १५ ः येथील बसस्थानकात फलाटाजवळ रेलिंगचे काम सुरु करण्यात येणार असून त्यासाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. परंतु, हे काम पंधरा दिवसापासून ठप्प असून खड्डे, खडी तशीच पडली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. हे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी जनतेतून होत आहे.
-----------------
येथे गतवर्षी १९ नोव्हेंबरला बस फलाटात घुसून आदर्श बोऱ्हाडे या बालकाचा मृत्यू झाला होता तर तीन प्रवासी जखमी झाले होते. त्यामुळे पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी फलाटासमोर अडथळा निर्माण करण्यासाठी लोखंडी रेलिंग लावण्याची मागणी होत होती. तब्बल ११ महिन्यानंतर ही मागणी पूर्णत्वास जात आहे. स्थानकातील फलाट व बस उभे राहण्याच्या ठिकाणी ही रेलिंग बसविण्यात येणार आहे.
------------
रेलिंगसाठी खड्डे खोदण्यात आली आहेत. खड्ड्यातील माती, मुरुम, खडी तशीच फलाटासमोर समोर पडून आहे. खड्डेही तसेच उघडे आहेत. बस फलाटावर येताच प्रवासी बसमध्ये जागा पकडण्यासाठी बसकडे धाव घेतात. यावेळी अनेकांचे पाय खड्ड्यात पडून प्रवासी जमिनीवर पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अतिशय वर्दळीच्या जागी हे खड्डे खोदून तसेच ठेवल्यामुळे हा प्रवाशांच्या जिवाशी खेळ चालला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रेलिंग लावण्याचे काम खड्डे केल्यानंतरही १५ दिवसापासून का रखडले आहे ,ते सुरु व्हावे यासाठी प्रयत्न का करण्यात येत नाहीत असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. खड्ड्यांजवळ असलेल्या खडीचे दगडही टायरखालून उडून प्रवाशांना लागत असल्याने आणखी काही घटना होण्याअगोदर हे काम पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
------------------
या कामाबाबत अधिक माहिती घेतली असता संबंधित काम घेतलेल्या ठेकेदाराने आणखी अनेक ठिकाणी कामे घेतली असून येथे खड्डे खोदून केवळ काम सुरु केल्याचा देखावा केला आहे. सध्या सणांचे दिवस असून बस गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची संख्याही अधिक असते. गर्दीच्या वेळी या खड्ड्यात पडून अनेक जण जायबंदी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी प्रवासीवर्गाने केली आहे.
-----------------