SNR26B22921
सिन्नर ः सिन्नर तालुका काँग्रेस समितीतर्फे नायब तहसीलदार माणिक गाडे यांना निवेदन देताना उपस्थित विनायक सांगळे, गोरख सांगळे, बाळासाहेब गोरडे, मुजाहीद खतीब आदी.
-------------------
सिन्नरला कॉंग्रेसतर्फे दुष्काळप्रश्नी निवेदन
------------
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमारांच्या राजीनाम्याची मागणी
------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.२ ः सिन्नर तालुका काँग्रेस समितीतर्फे दुष्काळ व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा मनमानी कारभाराबाबत तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार माणिक गाडे यांनी निवेदनाचा स्वीकार केला.
-------------
तालुकाध्यक्ष गोरख सांगळे, माजी तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांनी मागणीचे निवेदन दिले. माजी कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरडे, माजी शहराध्यक्ष मुजाहिद खतीब, माजी जिल्हा सरचिटणीस सुनील सोनवणे, किसान सेल माजी अध्यक्ष चंद्रकांत डावरे, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शब्बीर सय्यद, शहर उपाध्यक्ष मंगेश काकड, कार्याध्यक्ष भावेश शिंदे, अशपाक शेख, तालुका सेवादलाचे अध्यक्ष बापू डावरे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष प्रकाश मदगे, विशाल सानप, सुदाम घेगडमल, विठ्ठल बोडके, उदय जाधव, जयराम सांगळे, सोमनाथ गवांदे, हनुमंत गवारे आदी उपस्थित होते.
काँग्रेस समितीच्या शिष्टमंडळाने तहसील कार्यालयास दोन निवेदने दिली. तालुक्यात दुष्काळविषयक उपाययोजना, मदत आणि सवलतींची प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तालुक्यात खरिप वाया गेला असून पिण्याच्या पाण्याची टंचाई आतापासून भासू लागली आहे. दुष्काळी उपाययोजनांची पारदर्शी अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
ज्ञानेशकुमार यांचाही स्वतंत्र निवेदनाद्वारे निषेध करण्यात आला. मनमानी एसआयआर प्रक्रियेमध्ये झालेल्या कथित अनियमिततांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सिन्नर तालुका काँग्रेस समितीने केली आहे.