एसआयआर रद्दसाठी काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा

एसआयआर रद्दसाठी काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा
Published on: 
२३१५४ ----- सिन्नर ः काँग्रेसतर्फे येथील तहसीलसमोर सोमवारी आंदोलन करताना काँग्रेसचे पदाधिकारी. ३६-२ ‘एसआयआर’ रद्दसाठी काँग्रेसचा सिन्नरला मोर्चा ------------------ सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.१९ ः एसआयआर प्रक्रिया रद्द करावी व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना हटविण्यात यावे या मागणीसाठी काँग्रेसतर्फे तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी वावी वेस येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर घोषणाबाजी करुन आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर यांनी मार्गदर्शन केले. तालुकाध्यक्ष गोरख सांगळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सिन्नर तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. तालुका काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरडे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मुजाहिद खतीब, माजी जिल्हा सरचिटणीस सुनील सोनवणे, अल्पसंख्याक विभागाचे माजी कार्याध्यक्ष झाकिर शेख, अल्पसंख्याक कमिटीचे अध्यक्ष शब्बीर सय्यद, ज्येष्ठ काँग्रेस सदस्य संतू हुलुळे, उत्तमराव पवार, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष पवार आदी सहभागी झाले होते. एसआयर प्रक्रिया तातडीने रद्द करावी, मतदारयादीतील बदलांची निष्पक्ष चौकशी करावी, मतदान व मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, प्रत्येक पात्र मतदाराच्या मतदानाच्या अधिकाराचे संरक्षण करावे, लोकशाहीची गळचेपी थांबवावी व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवावे, अशा मागण्या करण्यात आल्या. भारतीय निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह व्हावी तसेच देशातील लोकशाही व संविधानाचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आल्याचे गोरक्ष सांगळे यांनी सांगितले. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com