पान दोन
---------------
23575
सिन्नर : न्यायालयासमोर दुसऱ्या दिवशी धरणे आंदोलनात सहभागी झालेले कर्मचारी.
न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपाला
सिन्ना वकील संघाचा पाठिंबा
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १८ : येथील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही संप सुरु होता. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी न्यायालयासमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान या आंदोलनाला वकिल संघाने पाठिंबा दिला आहे.
वकील संघाचे अध्यक्ष जयसिंग सांगळे, सदस्य ए. एल. गुरुळे, व्ही. बी. गोळेसर, श्रीराम क्षत्रिय, बी. सी. केदार, भाऊशेठ भाटजिरे, गंगावणे, शिवानी जेऊघाले यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलनास पाठिंबा दिला. संघाने दिलेल्या पाठिंब्याचे पत्र यावेळी वाचून दाखवण्यात आले. अँड. गोळेसर, अँड. शिवानी जेऊघाले यांनी मनोगत व्यक्त केले. न्यायालयाचे अधीक्षक घनश्याम जाधव, अनिल साबणे, प्रवीण खैरनार, पटेकर, गणेश जाधव, संजय ढिकले, अक्षय राऊत, विनायक पडवळ आदी कर्मचारी आंदोलन सहभागी झाले आहेत. राहुल जाभंळे यांनी वकील संघाचे आभार मानले. ‘समान काम समान वेतन’ या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना २००६ पासून सुधारित वेतनश्रेणी लागू झाली असून ही वेतनश्रेणी दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही लागू करा, अशी मागणी आहे.