नगराध्यक्ष, नगरसेवकांची पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी

नगराध्यक्ष, नगरसेवकांची पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी
Published on: 
SNR26B23497 सिन्नर ः कडवा पंपिंग स्टेशनवर दिवाळी साजरी करताना विठ्ठल उगले, हर्षद देशमुख, सागर भाटजिरे, पंकज जाधव, दत्ता हांडे आदी. ------------------ ३०-२ पाणीपुरवठा कर्मचाऱ्यासोबत लोकप्रतिनिधींची दिवाळी -------------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. १२ ः बाराही महिने दिवसरात्र सेवा देणाऱ्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांसोबत येथील नगराध्यक्ष, नगरसेवकांनी दिवाळी साजरी केली. लक्ष्मीपूजनही कडवा पाणीपुरवठा योजनेच्या धरणातील पंपिंग स्टेशनवर करण्यात आले. त्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. कडवा पंपिंग स्टेशनसह कोनांबे जलशुध्दीकरण केंद्र, मोहदरी जलशुद्धीकरण केंद्र येथे जात लक्ष्मीपूजन करण्यात आले. नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, गटनेते सागर भाटजिरे, नगरसेवक पंकज जाधव आणि दत्तात्रेय हांडे आदींनी विभागातील वाँलमन, जलशुद्धीकरण केंद्र कर्मचाऱ्यांसमवेत ही दिवाळी साजरी केली. तीन वर्षांपासून दसरा आणि दिवाळीसारख्या सणांच्या काळात कडवा पंपिंग स्टेशन येथे तांत्रिक बिघाड होऊन पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला होता. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला होता. परंतु, यंदा पुन्हा हा कटू अनुभव टाळण्यासाठी, तांत्रिक बिघाड होऊ नये, पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे सणासुदीच्या काळात सिन्नर शहराचा पाणीपुरवठा नियमित आणि सुरळीत सुरू राहिला. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. त्यामुळे त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी करण्यात आली. सण, आठवड्याच्या सुट्टीच्या दिवसातही पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन पाणी पुरवठा सुरळीत ठेवला. त्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनीही लोकप्रतिनिधींचे आभार मानले. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.