सिन्नरला दुष्काळाने ६४ हजार हेक्टर पिके बाधीत ६० कोटींवर नुकसानीचा अहवाल सादर, ६१ हजारावर शेतकऱ्यांचे नुकसान

सिन्नरला दुष्काळाने ६४ हजार हेक्टर पिके बाधीत  ६० कोटींवर नुकसानीचा अहवाल सादर, ६१ हजारावर शेतकऱ्यांचे नुकसान
Published on: 
SNR26B23166 सिन्नर ः तालुक्यात दुष्काळाने बाधित झालेले भुईमुगाचे पिक. -------------------- सिन्नर तालुक्यात दुष्काळाने ६४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित ६० कोटींवर नुकसानीचा अहवाल सादर ------------ सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.१९ ः तालुक्यात ७५ टक्के पाऊस झाल्याने खरीप पिकांना फटका बसला आहे. कृषी, महसूल व पंचायत समितीने केलेल्या संयुक्त पाहणीत ६४ हजार १६० हेक्टर क्षेत्र ३३ टक्क्यांहून अधिक बाधित असल्याचा अहवाल तयार केला आहे. बाधित क्षेत्रासाठी ६० कोटी ७३ लाख रुपयांची भरपाईची शिफारसही केली आहे. ----------------- तालुका दुष्काळी जाहीर झाल्यानंतर तालुक्यात १२४ पालक अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे करण्याचे काम सुरु होते. तहसीलदार सुरेंद्र देशमुख, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे, गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामे तयार करण्यात आले. प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे करण्यात आले. खरिपातील जिरायतीखालील सरासरी ६१ हजार हेक्टरपैकी सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद अहवाल करण्यात आली आहे. ३९ हजार ५४६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. मक्याचे १५ हजार ३०३ हेक्टर, बाजरीचे ७७७ तर भुईमुगाचे एक हजार ७५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तूर, सुर्यफुल, भात, मुग ज्वारी, कापूस, उडीद असे एकुण ५७ हजार ९१६ हेक्टर बाधित झाले आहे. त्यासाठी ४९ कोटी २२ लाख रुपयांच्या निधीची नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे. ६१ हजार १५१ शेतकऱ्यांचे हे नुकसान आहे. बागायत पिकाचे ७८६ हेक्टरवर नुकसान झाले आहे. वटाण्याचे ५५२ हेक्टर, कोबीचे २३०, फ्लाँवरचे १०४ तर टोमॅटोचे एक हजार २७५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यासह पालेभाजी, शेवगा, मिरची, कांदा वाल, कोथंबी, परदेशी भाजीपाला, वांगी, घेवडा, गाजर, झेंडू ही पिकेही बाधित झाली आहेत. सात कोटी ८६लाख रुपयांचे हे नुकसान आहे. १६-१ डाळींबाला मोठा फटका फळपिकांच्या पंचनाम्यात डाळींबा बागांना सर्वाधिक फटका बसल्याची नोंद झाली आहे. डाळींबाचे ८६४ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. द्राक्षाचे ६४४, पेरुचे २६, चिक्कूचे ६ हेक्टर क्षेत्र बाधित आहेत. बोर पपई, ड्रॅगन फ्रुट, लिंबू, केळी, सीताफळ यालाही फटका बसला आहे. त्यासाठी तीन कोटी ६४ लाख रुपयांची नुकसान भरपाईची अपेक्षा आहे. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com