पर्यावरण पूरक बससाठीच पर्यावरणाची हानी सिन्नरला बसस्थानकात ७० झाडांची कत्तल

पर्यावरण पूरक बससाठीच पर्यावरणाची हानी  सिन्नरला बसस्थानकात ७० झाडांची कत्तल
Published on: 
पान-४ अँकर फोटो-23277 सिन्नर ः बसस्थानकाजवळ तोडलेली झाडे. सिन्नरला चार्जिंग स्टेशनसाठी ७० झाडांची कत्तल पक्ष्यांचे आश्रयस्थान होणार नष्ट; वृक्षप्रेमींमध्ये हळहळ सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. २७ ः येथील बस आगाराला २० इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. पर्यावरणपूरक बसच्या चार्जिंग स्टेशनचीही उभारणी होणार आहे. तथापि, या चार्जिंग स्टेशनच्या उभारणीसाठी बसस्थानकातील ७० झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या बससाठी दोन कोटी रुपयांच्या खर्चातून चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. या कामालाही सुरुवात होणार आहे. २०२३ पासून चार्चिंग स्टेशनकरीता जागेची पाहणी केली जात होती. अखेर बसस्थानकाजवळच हे स्टेशन उभारण्याची तयारी केली जाणार आहे. दिवाळीपर्यंत दहा ई-बस आगाराच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी दहा बस मिळणार आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या बस चालविल्या जाणार आहेत. चार्जिंग स्टेशनच्या उभारणीसाठी वड, पिंपळ, करंजी, चिंच, कडुनिंबासारखी ७० झाडे तोडण्यात आली आहेत. झाडे तोडल्याने शेकडो पक्षाचे आश्रयस्थान नष्ट झाल्याने येथील वृक्षप्रेमींत हळहळ व्यक्त केली जात आहे. हा परिसर नेहमी पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजलेला राहत होता. प्रहारचे उद्या आंदोलन आगाराने वृक्षतोडीसाठी नगर परिषदेची रीतसर परवानगी घेतली असली तरी वृक्षतोडीमुळे सामाजिक संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. प्रहार जनशक्ती पक्षातर्फे वन विभागाच्या कार्यालयासमोर गुरुवारी (ता. २९) आंदोलन करण्यात येणार आहे. .... सातपट झाडे लावणार परवानगी घेऊनही झाडे तोडली असून, त्या बदल्यात ३५० झाडे लावण्यात येणार आहेत. सिन्नर व नांदूरशिंगोटे येथील बसस्थानकात ही झाडे लावली जाणार आहेत. ---- सविता काळे, व्यवस्थापक, सिन्नर आगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com