Sinnar Flood News : पुरात अडकलेल्यांना काढण्यासाठी सिन्नरकरांची एकजूट

Damage caused by heavy rains in the city
Damage caused by heavy rains in the cityesakal

सिन्नर (जि. नाशिक) : अतिवृष्टीमुळे शहरातील भैरवनाथ मंदिर परिसर, सिन्नर आयटीआयमागील वस्ती, शहरालगत असलेल्या वस्तींमधील अनेक कुटुंब पाण्याच्या वेढ्यात अडकले होते. सिन्नर पोलिस, नगरपालिका व चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन टीमने यांनी जीवाची परवा न करता पुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. (Sinnar Flood News Sinnar people united to rescue those trapped in flood Nashik Latest Marathi News)

रेस्क्यू ऑपरेशनवेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे, संदीप सांगळे, पप्पू आभाळे, मनोज भगत, प्रमोद चोथवे, विजय सावंत, सोमनाथ पावसे, नासिक वेस मित्र मंडळाचे पदाधिकारी, शिवशाही फाउंडेशनचे पदाधिकाऱ्यांनी मदत केली. अनेक समाजसेवकांनी जीवाची पराकाष्टा करीत अनेकांना बाहेर काढले, तसेच कानडी मळा, गंगावेस, विजयनगरमधील आपत्ती निवारणार्थ माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, हर्शद देशमुख, पंकज जाधव, मल्लू पाबळे आदींनी मदत कार्य सुरू ठेवले होते.

संगमनेर नाका येथील कुटुंबांना आधार देत माजी नगरसेवक नामदेव लोंढे, कुटुंबांचे सांत्वन केले व पुरात अडकलेल्यांना मदत केली. पुरात अडकलेल्या कुटुंबांना माजी आमदार राजाभाऊ वाजे व अनेक समाजसेवकांनी जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढले. अनेक घरांची पडझड झाल्याने ली अनेक कुटुंब बेघर झाली आहेत.

अनेक कुटुंबांचे संसार उद्धवस्त झाले असून, या कुटुंबांना प्रशासनाने मदत केली. सिन्नरकरांनी अनेक कुटुंबांना मंगल कार्यालयात ठेवून त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली. सर्व सिन्नरकरांनी एकजुटीने मदत कार्य सुरू ठेवले होते. अनेक ठिकाणी गाळ साचल्याने सिन्नर शहरात रस्ते बंद झाले होते.

Associated Media Ids : SNR22B04250,

Remarks :

पुरात अडकलेल्या कुटुंबांना काढण्यासाठी सिन्नर करांची एकजूट

Audit History:Date/Time Description ActionBy

9/2/2022 7:57:48 PM Story received from B-SINNAR vikas.gite

9/2/2022 10:45:57 PM Story Edited cramesh

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com