नाशिक- ओडिशातून आणलेला सुमारे सव्वाशे किलो गांजा समृद्धी महामार्गाने मुंबईला पोच करण्यासाठी निघालेले दोन चारचाकी वाहनांचा सिनेस्टाईल पाठलाग करीत नाशिक ग्रामीणच्या पथकाने तिघा सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. २४ लाखांच्या गांजासह दोन कार असा ३६ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर कारवाई समृद्धी महामार्गावरील सिन्नर हद्दीतील शिवडे शिवारात केली आहे. यातील फरार संशयित हा नाशिकमधील कुख्यात टिप्पर टोळीचा सदस्य असल्याचे निष्पन्न झाले आहे.