सिन्नरच्या उपनगरांत ३७ ब्लँक स्पाँट कचरा संकलनाचा प्रश्न ऐरणीवर,

सिन्नरच्या उपनगरांत ३७ ब्लँक स्पाँट  कचरा संकलनाचा प्रश्न ऐरणीवर,
Published on: 
पान-२ मेन ------------- SNR26B23517 सिन्नर ः शहरातील सरदवाडी पुलाजवळील कचऱ्याचा सर्वात मोठा ब्लॅकस्पॉट. --------------- सिन्नरमध्ये कचऱ्याचे तब्बल ३७ ब्लॅकस्पॉट -------------- घंटागाडीत कचरा न टाकण्याच्या वृत्तीमुळे शहराच्या अस्वच्छतेमध्ये दररोज भर ------------ सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.१४ ः सिन्नर शहरात कचरा संकलनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून उपनगरांमध्ये कचऱ्याचे सर्वाधिक ब्लॅक स्पॉट असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. एकूण ३७ ठिकाणी कचरा उचलला जात नसून नागरिकही बेफिकिरीने तेथे कचरा टाकत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान नगरपालिकेकडे वाहनांची भर पडल्याने पाच ठिकाणांचे कचरा निर्मूलन करण्यात प्रशासनाला यश आले आहे. ---------------- शहराचा विस्तार वाढल्याने कचरा संकलन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात ब्लॅक स्पाँटचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर नगरसेवक व प्रशासनाने मिळून ब्लॅक स्पॉटचा शोध घेतला. यात शहरात दोन तर उपनगरांत तब्बल ३५ ब्लॅकस्पॉट आढळून आले आहेत. त्यामुळे उपनगरांतील कचरा संकलनाचा मुद्दा प्राधान्याने समोर आला आहे. १६-१ यामुळे वाढले ब्लॅकस्पॉट नगरपालिकेकडे घंटागाड्यांची संख्या अजुनही पुरेशी नाही. घंटागाड्या कमी संख्येने असल्याने ठराविक क्षेत्रात त्या वेळेत पोहोचत नाहीत. संकलनासाठी सकाळची वेळ महत्त्वाची असली तरी संकलनासाठी वाहने दुपारी दोनला येत असल्याने नागरिकांसाठी ही वेळ गैरसोयीची ठरत आहे. त्यामुळे पुरेसे संकलन होत नाही. इमारतीत राहणारे अनेक नागरिक घंटागाडी येऊनही कचरा टाकण्यासाठी खाली उतरत नाहीत. रात्रीच्या वेळी बाहेर फिरण्यासाठी निघतानाच कचरा ब्लॅकस्पॉटवर फेकण्याची सवयही अनेक नागरिकांना आहे. १६-१ घंटागाडीसाठी प्रशासकीय निकष नगरपरिषद क्षेत्रात दरडोई दररोज प्रति व्यक्ती किमान ३०० ते ४०० ग्रॅम कचरा निर्माण होण्याचा अंदाज आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घरांतून दररोज कचरा उचलणे बंधनकारक आहे. एका प्रभागात किमान पाच ते साडेसात हजार लोकसंख्येमागे एक घंटागाडी असणे आवश्यक आहे. दाट लोकवस्ती व अरुंद गल्लीत किमान तीन ते चार हजार लोकसंख्येमागे घंटागाडी असावी. १६-१ पाच ब्लॅकस्पॉट हटविण्यात यश नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, मुख्याधिकारी अभिजित कदम, आरोग्य सभापती ललिता हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने नादुरुस्त तीन वाहने दुरुस्त केली आहेत. नव्याने तीन वाहने अशी एकूण पाच वाहने कचरा संकलनासाठी ताफ्यात आणली आहेत. त्यामुळे पाच ठिकाणचे ब्लॅकस्पॉट निर्मूलन करण्यात यश आले आहे. आणखीही काही वाहने ताफ्यात येणार आहेत. ------------------ दृष्टीक्षेपात सिन्नर--१६-१ एकूण मालमत्ता ः २८ हजार गतवर्षीच्या मालमत्ता ः २५ हजार ५०० लोकसंख्या ः एक लाख ------------------------- कोट सिन्नरमध्ये नुकत्याच केलेल्या पाहणीनुसार ब्लॅकस्पॉट शोधले आहेत. संबंधित ठिकाणी कचरा न टाकण्याबाबत नोटिसा लावल्या आहेत. वाहनांची संख्या वाढवून झिरो ब्लॅकस्पॉटचे नियोजन सुरु आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी म्हणून शहर स्वच्छ ठेवण्यास मदत करावी. इतरत्र कुठेही कचरा टाकू नये. - सायली बाविस्कर, आरोग्य निरीक्षक, नगरपरिषद. ----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.