सिन्नर- हायटेक बसस्थानकाच्या बांधकाम गुणवत्तेचे पितळ उघडे पडले आहे. या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, तसेच दोन दिवसांत प्रवाशांना निवारा उभारा. तालुक्यात पंधरा दिवसांपासून पाऊस सुरू असून, त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत व शहरातील नालेसफाईसह पावसाळ्यापूर्वीची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेसतर्फे करण्यात आली. याबाबत पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत निवेदन दिले. दहा दिवसांत उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.