Nashik Bus Fire : शिंदे टोलनाक्यावर मृत्यूचा थरार! सोलापूर-नाशिक बसने घेतला पेट; प्रवाशांचा थोडक्यात बचाव
MSRTC Bus Catches Fire Near Shinde Toll Naka : नाशिक-सिन्नर महामार्गावरील शिंदे टोलनाक्याजवळ सोलापूर-नाशिक एसटी बसला अचानक आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व १५ प्रवासी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
नाशिक रोड: नाशिक- सिन्नर महामार्गावरील शिंदे टोलनाक्यावर शुक्रवारी (ता.१३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास परिवहन महामंडळाच्या सोलापूर-नाशिक बसला (एच ०६, बी. डब्लू १२३५) अचानक आग लागली.