संपत ढोली: सिन्नर- सिन्नरचा गेल्या २० वर्षांपासून रखडलेल्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. तालुक्यात होऊ घातलेले लॉजिस्टिक पार्क आणि सिन्नर थर्मल पॉवर प्रकल्पाच्या हस्तांतराबाबत घडत असलेल्या घडामोडी याकडे येथील औद्योगिक क्षेत्राचेही लक्ष लागून आहे.