Impact on Ishanyeshwar Temple
sakal
सिन्नर: कॅप्टन अशोक खरात याला अटक झाल्यावर सिन्नर-शिर्डी मार्गावरील मिरगाव शिवारातील ईशान्येश्वर मंदिराजवळील ट्रस्टींच्या नावाचा फलक बुधवारी (ता.१८) हटविण्यात आला. मंदिराजवळील कार्यालय बंद, तसेच आलिशान बंगल्याचे प्रवेशद्वारही कुलूपबंद होते. एरवी दिवसभर राबता असलेल्या भाविकांनीही या कारवाईनंतर मंदिराकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.