Sinnar Protest : मुलीच्या अपहरणावरून सिन्नरकर आक्रमक; कडक कायद्याच्या मागणीसाठी हिंदू समाजाचा मोर्चा

Protest March Held in Sinnar Over Minor Girl Case : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविण्यात आले असून याचा शोध घेण्याची मागणी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने मोर्चा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Protest

Protest

sakal 

Updated on

सिन्नर: येथील अल्पवयीन मुलीला वीस दिवसांपासून फूस लावून पळवून नेण्यात आले आहे. तक्रार करूनही पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगून हे प्रकरण लव्ह जिहाद असल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाने येथे मंगळवारी मोर्चा काढत नाशिक-पुणे महामार्गावर धरणे आंदोलन केले. लोकांच्या भावना लक्षात घेत पोलिसांनी दहा दिवसांत शोध घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com