सिन्नर- शेततळ्याजवळ अंघोळीसाठी गेलेला मुलगा बुडत असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत थेट आईनेही पाण्यात उडी मारली. मात्र, त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने आडवाडी गावावर शोककळा पसरली आहे. अलका गणेश बिन्नर (वय ३५), साईनाथ गणेश बिन्नर (१३) अशी त्यांची नावे आहेत. लक्ष्मण भवानी बिन्नर यांच्या शेततळ्यात ही घटना घडली.