Crime
sakal
सिन्नर शहरातील विंचूरदळवी रस्त्यालगतच्या सांडपाण्याच्या नाल्यात नोव्हेंबरमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना काही तासांत ओळखही पटली, परंतु कोणाच्या अध्यात-मध्यात नसलेल्या व्यापाऱ्याचा खून कोणी आणि कशासाठी केला, असे गुंतागुंतीचे कोडे सिन्नर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी कल्पकतेने काही दिवसांतच उलगडले.