Raju Shetti
sakal
सिन्नर: नाशिक- पुणे रेल्वेमार्ग जुन्या सर्वेक्षणानुसारच व्हावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष उभारेल, असा ठाम इशारा संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. रेल्वेचे उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल; मात्र तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.