Nashik Pune Railway Route
sakal
सिन्नर: नाशिक-पुणे रेल्वेमार्ग हा जुन्याच मार्गाने सिन्नर-संगमनेर-आळेफाटा-नारायणराव-चाकणमार्गेच व्हावा, नवीन प्रस्तावित शिर्डीमार्गे मार्ग रद्द करावा, या मागणीसाठी सिन्नर रेल्वे कृती समितीतर्फे तहसील कार्यालयासमोर शनिवारी (ता.१७) धरणे आंदोलन करण्यात आले. संभाव्य नवीन रेल्वेमार्ग रद्द न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.