सिन्नर- राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) सिन्नर येथील नेते उदय पुंजाजी सांगळे हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत. त्यास स्थानिक भाजप नेत्यांकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. श्री. सांगळे यांच्या गोटातून अजून तसे काही नसून अफवा असल्याचे सांगितले जात असले तरी सुधाकर बडगुजर व नाशिकमधील नेत्यांच्या सोबतच सांगळे यांचा पक्ष प्रवेश सोहळा होण्याचे संकेतही स्थानिक नेत्यांनी दिले आहेत.