nylon manja
sakal
सिन्नर: मकर संक्रातीला बुधवारी (ता.१४) नायलान मांजाचा वापर करून पतंग उडविणाऱ्या सहा पालकांवर सिन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस व नगर परिषदेच्या संयुक्त पथकाने शहर व उपनगरातून १०० हून अधिक पतंग उडविणाऱ्यांकडून आसारीसह नायलान मांजा जप्त केला. दरम्यान १५ दिवसापासून नायलॉन मांजाविरोधात मोहिम राबवूनही पतंग उडविताना मोठ्या प्रमाणात नायलान मांजाचा वापर झाल्याचे दिसून आले.