Agricultural News : कांदा उत्पादकांचे कंबरडे मोडले! सिन्नरमध्ये तीन वर्षांतील नीचांकी दर; ५० टक्के नुकसान
Sharp Decline in Red Onion Prices in Sinnar : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेला लाल कांदा. यंदा आवक कमी असूनही दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले असून, भांडवली खर्च निघणेही कठीण झाले आहे.
सिन्नर: कांद्याचे उत्पादन घेणे आता शेतकऱ्यांसाठी मोठ्या जोखमीचे ठरत आहे. केंद्र सरकारच्या अनिश्चित आणि चुकीच्या धोरणांचा थेट फटका कांदा उत्पादकांना बसत असून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली.