Crime News: सिन्नर पोलिसांनी मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले
Sinnar Police Solve Mobile Snatching Case in 8 Hours : सिन्नर पोलिसांनी मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला असून, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
सिन्नर: महामार्गावर दुचाकीवरून येऊन मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना सिन्नर पोलिसांनी ताब्यात घेतले. शिर्डी मार्गावर घटना घडल्यानंतर आठ तासांत त्यांचा छडा लावला.