सिन्नर टुडे पान-४ मेन
-------------
लोगो-- वेध प्रभागाचा
प्रभाग २
(विजयनगर, कानडीमळा, विद्यावर्धिनीनगर)
-------
SNR26B23197
सिन्नर ः प्रभाग दोनमध्ये घराघरांवर लोंबकळणाऱ्या वीजतारा.
SNR26B23195
सिन्नर ः घरांवरून गेलेल्या वीजतारा
-----------------------
३६-५
लोंबणाऱ्या वीजतारा, नाल्यावरील अतिक्रमण धोकादायक
--------------
जीव मुठीत धरून दररोजचे जगणे ः अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त
-------------
संपत ढोली ः सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.२७ ः न्यायालयापासून ते उकाडे मळ्यापर्यंत विद्यावर्धिनी नगरापासून ते जुन्या गुळवंच मार्गापर्यंत प्रभाग विस्तारलेला आहे. महावितरणच्या दुर्लक्षित कारभाराने या प्रभागातील नागरिक सर्वाधिक त्रस्त आहेत. नळाला पाणी आले, की वीज गायब अशी येथील स्थिती आहे. दुसरीकडे गल्लोगल्ली लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे नागरिक हैराण असून अनेक घरावरून आणि घरांजवळून या वीज तारा गेल्यामुळे जीव मुठीत धरूनच दररोजचा दिवस ढकलावा लागतो. नाल्यांवरील वाढते अतिक्रमण पालिकेला दिसत नाही का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
----------
बाजार समिती, तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन, प्रशासकीय इमारत, ग्रामीण रुग्णालय, न्यायालय अशी महत्त्वाची कार्यालये विजयनगरालगत आहेत. त्यामुळे वकील, प्रशासनातील अधिकारी, व्यापारी, शिक्षक, उद्योजक यांचा रहिवास असलेला हा भाग आहे. कानडी मळ्यातही उपनगरांचा विस्तार वेगाने होत आहे. विद्यावर्धीनीनगर, समर्थनगर, राधाकृष्णनगर यासह विविध वस्त्यांवर काही भागात अजून रस्त्यांची वाणवा आहे.
विजयनगर, कानडी मळ्यात घराला अगदी खेटून असलेल्या वीज तारांनी रहिवाशांचा जीव कायम टांगणीला आहे. क्रिकेट मैदानाजवळ जमिनीवर टेकू पाहणाऱ्या वीज तारा आहेत. नळांना पाणी येताच वीज पुरवठा गायब होतो. त्यामुळे काही भागाला पाणी मिळते तर काही भाग पाण्यावाचून तसाच राहतो. ट्रान्सफॉर्मरची क्षमता अथवा संख्या वाढवण्यावर अनेकदा चर्चा झाल्या. मात्र त्याची पूर्तता अजून झालेली नाही.
१६-१
खंडोबा नाल्याचा प्रश्न ऐरणीवर
खंडोबा नाल्यावर दिवसेंदिवस अतिक्रमणे होत आहेत. नाला बुजविला जात असल्याने ढग्या डोंगराकडून येणारे पाणी वाहून जाण्यासाठी जागा राहिलेली नाही. त्यामुळे हे पाणी रहिवासी भागात घुसून ठिकठिकाणी साचून राहते. त्यास गतवैभव मिळवून देण्याची गरज आहे.
१६-१
प्रभागासाठीचे नियोजीत प्रस्ताव
१) विजयनगरात दोन बगिच्यांचा विकास होणार
२) कानडी मळ्यातही बगिच्याचा प्रस्ताव
३) जलवाहिन्यांची क्षमता वाढविण्यासाठी नियोजन
४) उकाडे, कुटे, पोटे वस्तीवर पथदीप
५) प्रभागातील नाले बंदीस्त करून जॉगिंग ट्रॅक
-----------------
लोगो
नगरसेवक काय म्हणतात...
कोट
पंकज जाधव SNR26B23199
प्रभागातील विविध नागरी समस्यांप्रश्नी पाठपुरावा सुरू आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून काही प्रस्ताव मंजुरीसाठी आहेत. टप्प्याटप्प्याने कामे तडीस लावली जातील. पाणीपुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य देत आहोत.
- पंकज जाधव, नगरसेवक
---------------
सविता कानडी SNR26B23201
लोंबकळणाऱ्या तारा, घरावरील तारा बदलणे, तीन ट्रान्सफॉर्मर नव्याने बसविणे हे काम लवकरच होणार आहे. अमृत योजनेच्या जलकुंभातून पाण्याचे समान वितरण सुरु होणार आहे.
- सविता कानडी, नगरसेवक.
-------------------
नागरिकांचे म्हणणे--लोगो
राजेंद्र कोकाटे SNR26B23203
अतिक्रमणे करून प्रभागातील खंडोबा नाल्याचे अस्तित्वच मिटविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे पावसाळ्यात डोंगराकडून येणारे पाणी वाहण्यासाठी जागा नाही. हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
- राजेंद्र कोकाटे, रहिवासी, कानडी मळा.
-------------------
श्यामसुंदर झळके SNR26B23205
पाणीपुरवठा सुरळीत करावा, कमीत कमी दिवसाआड नियोजित वेळेला एक तास पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी.
- श्यामसुंदर झळके, रहिवासी, विजयनगर.
--------------------
(उद्याच्या अंकात - प्रभाग क्र. ३ - शंकरनगर, उज्ज्वलनगर, समर्थनगर, हनुमाननगर, मुक्तेश्वरनगर एमजीनगर)