सरस्वती नदीला गतवैभवाची गरज उपनगरांत मुलभूत सुविधांचा अभाव

सरस्वती नदीला गतवैभवाची गरज  उपनगरांत मुलभूत सुविधांचा अभाव
Published on: 
वेध प्रभागाचा --------------- 23381, 23383 सिन्नर: देवी मंदिर मार्गाचे नुकतेच झालेले काँक्रीटीकरण. दुसऱ्या छायाचित्रात ऐश्वर्येश्वर गार्डनमधील तुटलेल्या खेळणी. प्रभाग ९ (दयानंद मठ, आडवा फाटा, एस. टी. काँलनी, आयटीआय, हांडे मळा) सरस्वती नदी पात्राला अतिक्रमणाचा विळखा गतवैभव मिळवून देण्याची गरज; रस्त्यांसह सांडपाणी व्यवस्थेचा अभाव संपत ढोली : सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. ४ : दयानंद मठापासून ते आडव्या फाट्यापर्यंत, एस. टी. कॉलनीपासून ते हांडे मळा आणि नायगाव रोडपर्यंत प्रभाग क्रमांक नऊचा विस्तार पसरलेला आहे. विशेष म्हणजे, याच प्रभागात पवित्र सरस्वती नदीचा उगम होतो आणि नदीचा सुमारे ८० टक्के भाग याच प्रभागातून वाहतो. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे या नदीला तिचे गतवैभव मिळवून देणे काळाची गरज बनली आहे. तसेच उपनगरांचा विस्तार होत असतानाच येथील मूलभूत समस्यांमध्येही वाढ झाली आहे. सरस्वती नदीचे सुशोभीकरण १० वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. परंतु ते काम रखडले. आता पुन्हा एकदा सुशोभीकरण करण्याबाबत चर्चा आहेत. नुकताच नदीपात्रातून २०० हून अधिक डंपर गाळाचा उपसा करण्यात आला असला, तरी नदीपात्रातील वाढलेली अतिक्रमणे हा येथील मुख्य प्रश्न बनला आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही. दुसरीकडे, सिडकोनगर, विनरनगर, साईदत्तनगर, आयटीआय परिसर, संभाजीनगर आणि सप्तशृंगीनगर या उपनगरांमध्ये आजही पक्के कॉलनी रस्ते, पुरेशी सांडपाणी व्यवस्था व ड्रेनेज लाइनचा अभाव जाणवतो. काही प्रमुख रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागले असले, तरी अंतर्गत रस्ते आणि गटारींच्या व्यवस्था अजूनही अपूर्ण आहेत. या समस्या मार्गी आयटीआय परिसर ग्रामीण फिडरवर होता. त्यामुळे भारनियमन मोठ्या प्रमाणात होते. आता त्यासाठी स्वतंत्र फिडर असल्याने वीज समस्या सुटली आहे. गोजरे मळ्यात गटारीची व्यवस्था नव्हती. ती पूर्णत्वास गेली आहे. प्रभागात तीन ठिकाणी ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) बसविले आहेत. इतरही उपनगरांत कचरा संकलन, पथदीपांचे प्रश्न सुटले आहेत. एसटी कॉलनी परिसरात सिमेंट काँक्रीट रस्ते झाले आहेत. सिद्धेश्वर नगरात नमो उद्यान विकसित होत आहे. प्रभागासाठीचे नियोजीत प्रस्ताव सरस्वती नदीचे सुशोभीकरणासाठी ४१ कोटी रुपये गोविंद गोपाळ ते दयानंद मठ जाँगिंग ट्रँक ईदगाह मैदान ते गोजरे मळा वहिवाट रस्त्याचे काम पिंप्री रोड ते नायगाव रोड ते सिन्नर महाविद्यालय २४ मीटर मार्ग 23385 रस्ते, गटारी, वीज, पाणी यासारखे प्रश्न तातडीने सोडवण्यास प्राधान्य दिले आहे. बरेच प्रलंबित प्रश्न सोडविले आहेत. उर्वरित उपनगरांतील प्रश्नही सोडवणार आहे. अजय गोजरे 23387 उपनगरांत रस्ते, गटारींची सुविधा होण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यावर भर असून विविध प्रस्ताव दाखल केले आहेत. ललिता हांडे नागरिक काय बोलतात 23389 उपनगरांचे सांडपाणी महाविद्यालय समोरील शेत जमिनीत सोडून दिले आहे. १५ वर्षापासूनचा हा प्रश्न समाधानकारकपणे सुटलेला नाही. ईदगाह रोड ते गोजरे मळा वहिवाट रस्ता करावा. पोपट लोंढे, गोजरे मळा सप्तशृंगी परिसरातील विजेचा प्रश्न सुटला आहे. आता फक्त रस्ते होणे गरजेचे आहे. सध्या कच्चे रस्ते असून त्यांची काँक्रटीकीरण करावे. बंदीस्त गटारींची सुविधा करण्यात यावी. सुनील चिकटे, सप्तशृंगी नगर (उद्याच्या अंकात : प्रभाग क्र. १० : उद्योगभवन, आयोध्यानगर, साईबाबानगर, आश्विनाथ नगर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.