drainage problem
sakal
सिन्नर: सरदवाडी मार्गावरील उपनगरातील नागरिकांची दुर्गंधीसह गटारीच्या वाहत्या पाण्यातून वावरण्यापासून सुटका होणार आहे. नगरसेवक, नागरिकांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, नगर परिषदेकडून मोठे पाइप टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, दुरुस्तीचे काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना खासदार राजाभाऊ वाजे यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.