पंचायत समितीचे आयडाँल ठरले आंबरे, वाघ

पंचायत समितीचे आयडाँल ठरले आंबरे, वाघ
Published on: 
फोटो-23279 सिन्नर ः पंचायत समितीच्या आयडॉल परीक्षेत यश मिळविलेले शिक्षक, विद्यार्थ्यांना गौरविताना पंचायत समितीचे अधिकारी. पंचायत समितीचे आंबरे, वाघ आयडॉल सिन्नर ः तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे सिन्नर तालुकास्तरीय आयडॉल शिक्षक व आयडॉल विद्यार्थी प्रश्नमंजूषा व स्पर्धा परीक्षेत शिक्षक गटातून सुनील आंबरे, तर विद्यार्थ्यांमधून समृद्धी वाघ यांनी यश मिळविले. त्यांना पंचायत समितीने सन्मानित केले. विस्तार अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष कैलास सांगळे, शिक्षण विस्तार अधिकारी सुनीता अहिरे, शिक्षक नेते आनंदा कांदळकर, संजय भोर, श्रावण वाघ, खंडेराव सोनवणे आदी उपस्थित होते. स्पर्धेत १३९ शिक्षक, ३४२ विद्यार्थी सहभागी झाले होते. भाषा, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी व मानसशास्त्र यावरलेखी चाचणी घेण्यात आली. यानंतर प्रथम पाच शिक्षक व विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञानावर आधारित स्पर्धा झाली. लेखी व प्रश्नमंजूषा स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवणारे शिक्षक सुनील आंबरे यांनी तालुकास्तर आयडॉल शिक्षक पुरस्कार प्राप्त केला, शिवडे येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी समृद्धी वाघ आयडॉल विद्यार्थिनी ठरली. शिल्पा देशमुख द्वितीय, सचिन मोरे तृतीय आले. विद्यार्थ्यांमध्ये स्वरा बोडके द्वितीय, यश खरपुडे याने तृतीय आले. ......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com