Manikrao Kokate, Uday Sangale, Rajabhau Waje
sakal
संपत ढोली सिन्नर: सिन्नर ते ठाणगाव रस्त्याचा प्रश्न चांगला चर्चेत आला आहे. आधी रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि आता आमदार माणिकराव कोकाटे आणि भाजप नेते उदय सांगळे यांनी रस्त्याबाबत घेतलेल्या भूमिकांमुळे. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या डुबेरे गावात झालेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर हा राजकीय सामना अटीतटीवर येऊन पोहोचला आहे.