सिन्नर- सेझ प्रकल्पग्रस्त कामगारांना महाजनकोत थेट समावेश करून घेण्याबाबत कामगारांच्या शिष्टमंडळाने खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत चर्चा केली. सिन्नर थर्मल पॉवर कंपनीबाबत होत असलेल्या घडामोडींच्या पाश्वभूमीवर ही चर्चा झाली. दरम्यान, खासदार वाजे यांनी महाजनकोचे अध्यक्ष बी. राधाकृष्णन यांच्यासोबत कामगार प्रतिनिधींची बैठक घेण्याचे आश्वासन दिले.