संपत ढोली : सिन्नर- महाजनको व एनटीपीसीएलतर्फे सिन्नर थर्मल पॉवर प्रकल्प सुरू करण्यासाठी तयार केलेली ठराव योजना कंपनी न्यायाधिकरणाकडे मंजुरीस पाठविली आहे. ही योजना कर्जदार समितीच्या मान्यतेनंतर पाठविण्यात आली असून, त्यामुळे हा प्रकल्प पुनरुज्जीवित होण्याच्या आशा आणखी बळावल्या आहेत. दरम्यान, ही घडामोड अंतिम टप्प्यातील मानली जात आहे.