संपत ढोली : सिन्नर- गेल्या काही महिन्यांपासून सिन्नरच्या प्रगतीचे डिंडीम वाजू लागले आहेत. एकीकडे औद्योगिक विकासाला मिळणारी चालना तर दुसरीकडे वाढत असलेल्या कनेक्टिव्हिटीमुळे मोठमोठी शहरे जवळ येऊ लागली आहेत. सिन्नर हे राज्यातले एकमेव असे शहर ठरत आहे की, महत्त्वाच्या कनेक्टिव्हिटी याठिकाणी एकवटल्या जात आहेत.