

Nashik News : सिन्नर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खापराळे नाका व सिन्नर सरदवाडी रस्त्यावर बेशिस्त वाहतुकीवर ठोस उपाययोजना म्हणून पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नायलॉन दोरीचा पॅटर्न राबवला आहे.
सिन्नर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. (sinnar traffic problem is solved by traffic police nashik news )
त्यामुळे इथल्या बेशिस्त वाहतुकीला आळा बसून या परिसराने मोकळा श्वास घेतला. सिन्नर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खापराळे नाका व सिन्नर सरदवाडी रस्त्यावर भाजीबाजार, भाजीविक्रेते व हातगाडी, टपरी दुकानांच्या अतिक्रमणामुळे कायम वाहतुकीची कोंडी होत असल्याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या होत्या.
त्याअनुषंगाने पोलिस चंद्रशेखर यादव यांनी फौजफाटा घेऊन २६ जानेवारी रोजी सिन्नर नगरपालिका अतिक्रमण विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन संबंधितांना आपापली दुकाने मागे घेण्याच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे दुकाने मागे घेतली. ही कारवाई ४ तास चालली.
पोलिस निरीक्षक यादव यांनी अनेक ठिकाणी असा प्रयोग करून वाहतुकीची समस्या सोडवली आहे. सकाळपासून २ ते अडीच तास नायलॉन दोरीचा प्रयोग राबवून या दोऱ्या लोखंडी खिळ्याने मजबूत ठोकल्या.
यापुढील काळात दोऱ्यांच्या आतील बाजूलाच भाजी विक्रेत्यांनी बसावे अशा सूचना दिल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा दिला आहे. या अनोख्या उपक्रमाचे सिन्नरच्या नागरिकांकडून कौतुक होत आहे.
पोलिस हवालदार सुकदेव जाधव, माणिक टिळे, पो.ना.विनोद गोसावी, समाधान बोराडे, धनाजी जाधव, हेमंत तांबडे, अंकुश दराडे, कृष्णा कोकाटे, मंगलसिंग सोनवणे, प्रकाश चव्हाण तसेच सिन्नर नगरपालिका अतिक्रमण विभागाचे अमित रायते, प्रशांत गरगटे, सागर वराडे, गणेश जगताप आदींनी याबाबत परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.