पान-३ मेन
फोटो-23307
सिन्नर ः वन विभाग कार्यालयासमोर गुरुवारी वृक्षतोडीबाबत आंदोलन करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कार्यकर्ते.
वन विभाग कार्यालयासमोर राष्ट्रवादीची धरणे
बसस्थानक झालेल्या वृक्षतोडीच्या चौकशीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. २९ ः राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे गुरुवारी (ता. २९) येथील वन विभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सिन्नर येथील बसस्थानक परिसरात चार्जिंग स्टेशनसाठी झालेल्या वृक्षतोडीला दिलेल्या परवानगीची चौकशी करण्याची मागणी या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे करण्यात आले. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी हर्शल पारेकर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
......
दरम्यान, सिन्नर बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या चार्जिंग स्टेशनच्या जागेसाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीस वन विभागाने परवानगी दिली नसल्याचे यावेळी वन विभाग अधिकाऱ्यांनी आंदोलकांना सांगितले.
तालुकाध्यक्ष शरद शिंदे, शिवाजी गुंजाळ, भाऊसाहेब जाधव, दिलीप आव्हाड, पुंडलिक बलक, बाळू उघडे, सोपान जाधव, अशोक वरंदळ, कचरू कराड, राजू दिवे, सुकदेव शिंदे यांनी धरणे आंदोलन केली. बस स्थानकाजवळ अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात व डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली. यामुळे वृक्षप्रेमींमध्ये नाराजी असून, यामुळे मोठ्या प्रमाणात शेकडो पक्षी बेघर होणार असून, पक्ष्आंची किलबिलाट मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे याबाबत मिळालेल्या परवानगीची चौकशी व्हावी, असे निवेदनात म्हटले आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, ग्रामीण भागातील वृक्षतोड तत्काळ थांबवावी, त्याचप्रमाणे सरदवाडी रस्त्यालगतही तोडलेल्या झाडांच्या प्रकरणाचीही चौकशी व्हावी, पंचवटी मोटेल्स येथेही वृक्षतोड सुरू असताना ती थांबविण्यात आली असून, सर्वच प्रकरणांची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, वनविभाग नाशिक, तहसीलदार यांना पाठविण्यात आल्या आहेत.