Stray Dogs Attack Deer in Sinnar : सिन्नरमध्ये मोकाट कुत्र्यांचा हरणावर हल्ला; जीव वाचवला पण वनविभागाच्या दिरंगाईने संताप!
Sinnar Forest Department Negligence : सिन्नर तालुक्यातील वावी शिवारात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाला वन्य प्राणी मित्र दुर्गेश शिंदे यांनी वाचवून उपचार केले, मात्र वनविभागाच्या दिरंगाईमुळे नाराजी व्यक्त झाली.
सिन्नर- वावी शिवारात शिर्डी मार्गालगत हरणावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. त्यास चावे घेतल्याने अत्यवस्थ स्थितीतून हरणाला सोडवून उपचार करण्यात आले. मोकाट कुत्र्यांचा उपद्रव सिन्नर तालुक्यातही वाढला आहे.