Harshad Deshmukh
sakal
सिन्नर: संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या सिन्नरच्या उपनगराध्यपदी बुधवारी (ता.१४) राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षद देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्वीकृत नगरसेवकपदावर राष्ट्रवादीच्या दोघांना, तर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या एकास संधी मिळाली. निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष साजरा केला. दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या समसमान जागा असूनही स्वीकृत सदस्यांच्या निवडीत आमदार कोकाटे यांचे वर्चस्व राहिल्याचे दिसून येते.