वेध प्रभागाचा लोगो घेणे
---------------------
प्रभाग क्र. ३ : शंकर नगर, उज्ज्वल नगर, समर्थ नगर, हनुमान नगर, मुक्तेश्वर नगर, एमजी नगर
23208
सिन्नर : गुळवंच मार्गाचे सुरु असलेले काम.
23210
रस्ते, गटारी नसलेले हनुमाननगर.
विस्तार मोठा, पण सुविधा अपुऱ्या
रस्ते, सांडपाणी, घंटागाडी अन् विजेचा प्रश्न ऐरणीवर
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. २८ : सिन्नरमधील एमजी नगरपासून ते मुसळगाव औद्योगिक वसाहत आणि जून्या गुळवंच रोडवरील हनुमान नगरापासून ते शिर्डी मार्गामार्गापर्यंत प्रभाग तीनचा विस्तार आहे. या प्रभागाचा विस्तार पाच किलोमीटरच्या परिघात विस्तारला आहे. मात्र, या ठिकाणाच्या नागरिकांना मूलभूत समस्यांपासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. प्रभागात दररोज खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त असून कचरा संकलनासाठी घंटागाडी वेळेवर येत नसल्याने कचऱ्याची योग्य विल्हेवाटीचा प्रश्न येथील नागरिकांना सातत्याने भेडसावतो.
प्रभाग तीनमध्ये खंडीत वीज पुरवठ्याने येथील व्यवस्था विस्कळीत आहे. दररोज कितीतरी वेळा पुरवठा खंडीत होतो. त्यातच पाणी पुरवठा सुरु झाल्यास वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाणही येथे जास्त आहे. अनेक वर्षांपासून झाडांमध्ये गुरफटलेल्या वीज तारांचीही वर्षानुवर्षे सुटका झालेली नाही. समर्थनगर, हनुमाननगर येथे अजून पुरेशा पथदीपांची सुविधा नाही. जाधव वस्ती, भावेश पेट्रोल पंपामागे घंटागाड्या जात नाहीत. त्यामुळे कचरा संकलनाचे येथे समस्या कायम आहे. नव्याने विकसित होणाऱ्या उपनगरात पक्के रस्ते झालेले नाहीत. हनुमाननगर, एमजी नगरात सांडपाणी निघण्यासाठी सुविधा नाही. रस्त्यांसह सांडपाणी व्यवस्थेची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
------------
मुलभूत सुविधांची वाणवा
नव्याने विकसित होत असलेल्या या भागात रस्ते, पथदीप, कचरा संकलन, अपुरा पाणीपुरवठा या समस्या आहेत. गुळवंच रोडचे काम सुरु आहे. मात्र कॉलनीमध्ये अजूनही पक्के रस्ते नाही.
---
प्रभागासाठीचे नियोजित प्रस्ताव
- हनुमाननगरात बंदीस्त गटार योजना
- विकसित होत असलेल्या उपनगरांत पथदीप
- खंडोबा नाल्यावर जाँगिंग ट्रँक
- छटपुजेसाठी घाट बांधणे
नगरसेवक काय म्हणतात
23212
प्रभाग तीनमध्ये रस्ते, गटारी, वीज या समस्यांची सोडवणूक होण्यासाठी नियोजनबद्ध विकासकामे हाती घेतली आहेत. तसे प्रस्तावही मंजुरीसाठी आहेत.
- आशीष गोळेसर, नगरसेवक
23214
मुलभूत सुविधा नागरिकांना चांगल्या प्रकारे कशा मिळतील यासाठी प्रयत्न करत आहे. पाणीपुरवठा, कचरा संकलन हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- कांताबाई जाधव, नगरसेवक
नागरिकांचे म्हणणे
23216
प्रभागात वीज पुरवठा किरकोळ कारणासाठी तासन्तास बंद ठेवण्यात येतो. वीजवाहक तारा झाडांमध्ये गेल्याने पुरवठा सतत खंडीत होतो. त्यावर कायमचा तोडगा काढण्यात यावा.
- पराग काळोखे (रहिवासी, मुक्तेश्वरनगर)
23218
काही भागात कमी तर काही भागात जास्त पाणी येते. पाण्याचे समतोल वितरण हवे. प्रभागात नियमित कचऱ्याचे संकलन करण्यात यावे.
- श्रावण वाघ (रहिवासी, एमजीनगर)
उद्याच्या अंकात प्रभाग चार – आंबेडकरनगर व परिसर
-----------------