सिन्नरला ६२ गावांना टँकरचे नियोजन दोन महिन्यात ९९ गावांत होणार विंधन विहिरी

सिन्नरला ६२ गावांना टँकरचे नियोजन  दोन महिन्यात ९९ गावांत होणार विंधन विहिरी
Published on: 
सकाळ विशेष--लोगो ---------------- चित्र वापरणे सिन्नर तालुक्यातील ६२ गावांना टँकरचे नियोजन दोन महिन्यात ९९ गावांत होणार विंधन विहिरी, किमान २१ कोटींचा खर्च अपेक्षित सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. ३१ ः सिन्नर तालुक्यात अल्प पावसामुळे टंचाई धग आत्तापासूनच जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी पंचायत समितीने टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. जून २०२७ अखेरपर्यत ६२ गावे ३५२ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे धोरण आखले आहे. त्यासाठी किमान २१ कोटी रुपये खर्च येणे अपेक्षित आहे. दरम्यान येत्या दोन महिन्यात तालुक्यात ९९ गावांत विंधन विहिरी खोदण्याचे नियोजन आखले आहे. -------------- आमदार माणिकराव कोकाटे, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. येत्या तीन दिवसात त्यावर पंचायत समितीत त्यावर चर्चेसाठी विशेष बैठकही होणार आहे. १६-१ डिसेंबरपर्यंत १४ गावांना टँकर आॅक्टोबर ते डिसेंबर अखेरपर्यंत १४ गावे १३१ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. डिसेंबरपर्यंत पांगरी बुद्रुक, पांगरी खुर्द, निऱ्हाळे, पाटपिंप्री, भोकणी, कहांडळवाडी, मिठसागरे, केपागनर, धुळवाड, खोपडी बुद्रुक, खोपडी खुर्द, कणकोरी, मनेगाव, रामनगर या गावांना टंचाई धग सर्वात अगोदर बसण्याचा अंदाज आहे. किमान ३५ हजार लोकसंख्येला हा पाणी पुरवठा होवू शकेल. १६-१ एप्रिल ते जून दरम्यान तीव्रता एप्रिल ते जून २०२७ या महिन्यांत सर्वाधिक टंचाईची धग जाणवणार आहे. या कालावधीत किमान ३९ गावे १६३ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठ्याची वेळ पडणार आहे. सोनारी, मानोरी, गुळवंच, बारागावपिंप्री, दातली, फुलेनगर, दुशिंगपूर, कोमलवाडी, हिवरगाव, सोनांबे, कोनांबे, जामगाव, किर्तांगळी, हिवरे, डुबेरे, पिंपळे, ठाणगाव, चास, चंद्रपूर आदी गावांचा संभाव्य टंचाईत समावेश आहे. १६-१ ९९ गावांत विंधन विहिरी टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी तालुक्यात अनेक वर्षानंतर प्रथमच विंधन विहिरींचे नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील विविध गावांत प्राथमिक शाळांच्या आवारात या विंधन विहिरी घेतल्या जाणार आहेत. याद्वारे टंचाईची धग कमी करण्याचे प्रयत्न होणार आहेत. दरम्यान भूजल पातळी खालावल्यास हे नियोजन कोलमडण्याचा अंदाज आहे. १६-१ चौकट दोन गावांचे प्रस्ताव दाखल तालुक्यात टंचाईची धग जाणवू लागल्याने रामनगर, पाटोळे या दोन गावांनी टँकर सुरु करण्याचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले आहेत. हे प्रस्ताव मंजुरीसाठी तहसील विभागाकडे देण्यात आले आहेत. दिवाळीनंतर या गावांना टँकर सुरु होण्याचा अंदाज आहे. ----------