फोटो-23041
सिन्नर ः जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देताना नगरसेवक.
सिन्नरच्या पाणी प्रश्नासाठी
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. ११ ः सिन्नरचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी व खंडित वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी कडवा योजनेवर सौर प्रकल्प उभारावा. त्यासाठी तातडीने उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी केली. याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले.
गटनेते मनोज देशमुख, बांधकाम सभापती उदय गोळेसर, पाणीपुरवठा सभापती पंकज मोरे, महिला व बालकल्याण सभापती अंबिका धनगर, नगरसेवक अमोल झगडे, सागर कोथमिरे, शुभम वारुंगसे, अशोक जाधव, नगरसेविका सविता खोळंबे, ज्योती मोरे, सविता कानडी, संध्या कासार, लक्ष्मी पवार, निशा बोडके, कमळाबाई पगार यांनी निवेदन दिले. सुनील खोळंबे, अमोल कासार, अक्षय कानडी, सुदर्शन बोडके, राजेंद्र पगार, सागर पवार आदी उपस्थित होते.
शहरातील पाणीप्रश्नावर त्वरित तोडगा काढावा, वीजपुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. कडवा योजनेला ७० लाखांचे वीजबिल येत असल्याने नगर परिषदेवर आर्थिक भार पडतो. शिवाय वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे योजना चालविणे अवघड आहे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
पुढील कार्यवाही करण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
.........