पस्तीस लाख लिटर पाणी कुठे मुरते? आमदार कोकाटे झाले अचंबीत, स्काडा प्रणाली महिनाभरात बसवण्याची सूचना

पस्तीस लाख लिटर पाणी कुठे मुरते?  आमदार कोकाटे झाले अचंबीत, स्काडा प्रणाली महिनाभरात बसवण्याची सूचना
Published on: 
पान-१--मेन ----------- SNR26B23138 सिन्नर ः नगरपरिषदेत पाणीपुरवठा, वीज महावितरणच्या आढावा बैठकीत बोलताना माणिकराव कोकाटे. समवेत विठ्ठल उगले, हर्षद देशमुख, अभिजित कदम, राजेंद्र चव्हाणके, अनिल झटकरे. ---------- सिन्नरचे ३५ लाख लिटर पाणी जाते कुठे? ---------- आमदार कोकाटेंचा अधिकाऱ्यांना प्रश्न ः स्काडा प्रणाली महिनाभरात बसवण्याची सूचना ---------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.१७ ः सिन्नर शहराला दररोज पावणेदोन कोटी लिटर पाणी उपलब्ध होत असताना नळधारक, दिलेल्या पाण्याचा हिशोब केला तर ३५ लाख लिटर पाणी मुरते कुठे, असा प्रश्न उपस्थित करत आमदार माणिकराव कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणीपुरवठ्यात पारदर्शीपणा येण्यासाठी स्काडा प्रणाली महिनाभरात बसवा, मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या व्हॉल्वमनवर कारवाई करा, असे आदेश त्यांनी दिले. ----------------- नगरपरिषदेत झालेल्या शहर पाणीपुरवठा, वीज महावितरणच्या संयुक्त आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, मुख्याधिकारी अभिजित कदम, राजेंद्र चव्हाणके, वीज महावितरणचे ग्रामीण कार्यकारी अभियंता अनिल झटकरे, उपकार्यकारी अभियंता हेमंत बनसोड, पाणीपुरवठा अभियंता प्रशांत मेश्राम आदींसह गटनेते अमोल देशमुख, पाणीपुरवठा सभापती पंकज मोरे, अनिल सरवार, पंकज जाधव आदी उपस्थित होते. ---------------- कडवा पंपिंग स्टेशनचा वीज प्रश्न निकाली निघणार आहे. परंतु, शहरातील वीजपुरवठा सुरळीत राहिला तरच पाणी वितरण सुरळीत होणार असल्याचे कोकाटे म्हणाले. त्यामुळे शहरात कमी दाब मिळणाऱ्या भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी सूचना महावितरण अधिकाऱ्यांना केली. १६-१ वर्षाला एक कोटी नुकसान रिटर्न व्हॉल्व्ह नादुरुस्त असल्याने जलवाहिनी फुटत आहेत, दुरुस्तीसाठी वर्षाला एक कोटीचे नुकसान होत असल्याचा मुद्दा उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्याधिकारी कदम यांनी संबंधित ठेकेदाराचे बिल दिले नसून, सहा वर्ष योजना रखडल्याने ठेकेदारावर दावा केला असल्याचे सांगितले. १६-१ आढाव्यासाठी आयआयटीला पत्र योजना सुरळीत चालण्यासाठी आयआयटी मुंबईद्वारे पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी नगरपरिषदेने पत्र दिले आहे. कोणत्याही स्थितीत महिनाभरात त्रुटी दूर करून पाणीपुरवठा सुरळीत करा, महिनाभरानंतर पुन्हा होणाऱ्या बैठकीत हा बदल दिसला पाहिजे असे ते म्हणाले. १६-१ चौकट नगरसेवकांनी केल्या या तक्रारी - कानडी मळा, उद्योग भवन परिसरात वीज समस्या - व्हॉल्वमनच्या मनमानीमुळे चार- चार दिवसांनी पाणी - उद्योगभवनच्या वॉल्व्हला कायम गळती - वर्ष झाले, अजून ट्रान्सफॉर्मर आला नाही - अधिकाऱ्यांकडून सदस्यांना उडवाउडवीची उत्तरे ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.