---------------------
महिलेच्या पर्समधून
तीस हजार चोरीस
सिन्नर ः येथील बसस्थानकात महिलेच्या पर्समधून ३० हजार रुपये चोरीस गेले आहेत. गुरुवारी (ता.१) दुपारी चारला ही घटना घडली. माधव गणेश गोजरे या स्थानकात बस पकडण्यासाठी जात असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने ही रोकड लंपास केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
--------------------
माळेगावला विहिरीत
महिलेचा मृतदेह
सिन्नर ः माळेगाव येथील भगवती स्टील कारखान्याच्या पाठीमागील विहिरीत सुमन पांडुरंग सांगळे (६४) यांचा मृतदेह मिळून आला. त्यांच्यावर दहा वर्षापासून मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार सुरु होते. घरी कोणी नसताना ही घटना घडली. कुटुंबातील सर्वजण घरी आल्यानंतर सुमन सांगळे यांचा शोध घेतला असता विहिरीत मृतदेह मिळून आला. पोलिसांनी आकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून हवालदार योगेश शिंदे तपास करत आहेत.
-----------------
खोपडी बुद्रुकला
एकाची आत्महत्या
सिन्नर ः खोपडी बुद्रुक येथे गाईच्या गोठ्यात लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. किरण बच्छाव आरखडे (३३) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. नागरिकांच्या मदतीने त्यांना खाली उतरवून उपचारासाठी रुग्णालयात आणले होते. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. हवालदार गायकवाड तपास करत आहेत.
--------------