Nashik News: डासांच्या उच्छादाने सिन्नरकर हैराण! सिन्नर- शिर्डी रस्त्यालग्यातील गटारीचे ढापे तुटले

Sewer cover along Shirdi road in broken condition.
Sewer cover along Shirdi road in broken condition.esakal

Nashik News : सिन्नर शहरात सध्या सर्वत्र डासांनी धुमाकूळ घातला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. असे असताना नगरपरिषद प्रशासनाचे मात्र याकडे लक्ष नाही. लवकरात लवकर फवारणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

काही महिन्यापूर्वी औषध फवारणी सुरू होती पण मध्यंतरी ती बंद असल्यामुळे डासांचा उच्छाद वाढला आहे. (Sinnarkar shocked by rise of mosquitoes Sewer covers along Sinner Shirdi road broken Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sewer cover along Shirdi road in broken condition.
Water Crisis: नियोजनबाह्य आवर्तनाने धरणे कोरडीठाक! वाकी, भाम धरणांत केवळ मृतसाठा, पाण्यासाठी दाहीदिशा सुरू

डासांचा उच्छाद सर्व शहरभर झाल्यामुळे नागरिकांना रात्री झोपणेही अवघड झाले आहे. त्यातच सध्या उष्णतेचे प्रमाण वाढल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. डास चावल्याने तापाचे प्रमाण वाढू लागले आहे. नगरपरिषदेने शहरातील नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.

गटारी उघड्या पडल्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी वाढल्याने डासांच्या पैदासीला चालना मिळत आहे. सिन्नर शिर्डी महामार्गावर वावी वेस ते मुक्तेश्वरनगर या भागात रस्त्याच्या कडेला भूमिगत गटारी असून यावरील काही ढापे चोरट्यांनी चोरून नेले, काही तुटले असून त्यामुळे गटारी उघड्या पडल्या आहेत.

दुर्गंधीयुक्त वास व डास त्यामधून बाहेर येत आहे. शेजारीच असलेल्या घरांना व उपनगरांना या उघड्या नालीमुळे डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. या गटारीवर झाकण टाकून बंदिस्त कराव्यात अशी मागणी नागरिक करीत आहे. रस्त्यावरील व्यक्ती नालीमध्ये अन्य घाण टाकत असल्याने डासांची उत्पत्ती होत आहे.

Sewer cover along Shirdi road in broken condition.
Water Shortage : येवल्यात २४ तास पाणीपुरवठ्या दिवास्वप्नच! 6 दिवसाआड पाणी पुन्हा चर्चेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com