

TCS case accused Nida Khan
Esakal
नाशिक - येथील बहुराष्ट्रीय नामांकित आयटी कंपनी ‘टीसीएस’मधील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण व धार्मिक भावना दुखावण्यासह धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला दानिश शेख याच्या मोबाईलचा ‘क्लोनिंग’चा सीलपॅक अहवाल विशेष तपास पथकाला (एसआयटी) प्राप्त झाला आहे. मोबाईलच्या ‘क्लोनिंग’ अहवालातून महत्त्वाचे धागेदारे ‘एसआयटी’च्या हाती लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी असलेली निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी (ता. २७) नाशिक रोड सत्र न्यायालयात सुनावणी होईल.