जुने नाशिक- खुनाच्या प्रयत्नातील सहा महिन्यांपासून फरारी संशयितास शहर गुन्हेशाखा युनिट १ पथकाने नानावली येथून अटक केली. शिवम ऊर्फ शुभम कोंडीराम हरगावकर (वय १८, रा. कोळीवाडा, नानावली) असे संशयिताचे नाव आहे..नाशिक-पुणे रोडवरील घंट्या म्हसोबा महाराज, मंदिरामागे हर्षल देवरे यांच्यावर लखन काशिद, क्रिश शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी ठार करण्याच्या उद्देशाने हॉकी स्टीक, दांडक्यानी तसेच धारदार शस्त्राने हल्ला केला होता. हर्षल देवरे गंभीर जखमी झाले होते. २४ सप्टेंबर २०२४ ला ही घटना घडली होती. उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल होता. यातील संशयित शुभम हरगावकर नानावली भागात येणार असल्याची माहिती पथकाचे अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप यांना मिळाली..पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक हिरामण भोये, पोलिस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, हवालदार रमेश कोळी, देवीदास ठाकरे, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, विलास चारोस्कर, जगेश्वर बोरसे, नितीन जगताप, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक किरण शिरसाठ यांनी सापळा रचत नानावली भागातून संशयितास ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्यास उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.