‘उद्योगक्षम‘उद्योगक्षम’ युवक घडविण्याव युवक घडविण्याव

‘उद्योगक्षम‘उद्योगक्षम’ युवक घडविण्याव युवक घडविण्याव
Published on: 
ॲंकर NSK26H32694 जळगाव : ‘जिल्हा कौशल्य अभिसरण कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी रोहन घुगे आदी. ------------ ‘उद्योगक्षम’ युवक घडविण्यावर भर जिल्हाधिकारी घुगे : कौशल्य विकास व उद्योजकतेसाठी कार्यशाळा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१६ : जिल्ह्यात औद्योगिकीकरणाची मोठी क्षमता असून, येथील युवकांना कुशल मनुष्यबळ आणि उद्योजक म्हणून घडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात औद्योगिक वसाहतींचे मोठे जाळे असतानाही उद्योगांची गरज आणि उपलब्ध कुशल मनुष्यबळ यामध्ये तफावत दिसून येते. ही दरी भरून काढण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ पदवीधर न बनवता उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षित करून ‘इंडस्ट्री रेडी’ अर्थात उद्योगक्षम बनविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवनाच्या समिती सभागृहात आयोजित जिल्हा कौशल्य अभिसरण कार्यशाळेत ते बोलत होते. केंद्र शासनाच्या कौशल्य विकास मंत्रालयातील उद्योजकता संचालक अमित मीना, अवर सचिव (पीएमकेव्हीवाय) संतोष कुमार, एनएसटीआय (मुंबई)चे उपसंचालक हर्षवर्धन शर्मा आणि सहायक निदेशक अक्षय कुमार यांनी सादरीकरणाद्वारे कौशल्य विकासविषयक विविध योजनांची माहिती दिली. विश्वकर्मा योजना संचालक अश्विनी डोंगरे, इंद्रभान काकड, अख्तर तडवी तसेच जिल्ह्यातील विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य उपस्थित होते. प्रास्ताविक इंद्रभान काकड यांनी केले. चौकट उद्योगांच्या गरजांनुसार कौशल्यविकास व्हावा खासदार स्मिता वाघ म्हणाल्या, की जिल्ह्याचा औद्योगिक विकास साधण्यासाठी उद्योगांच्या प्रत्यक्ष गरजांनुसार आणि स्थानिक मागणीचा विचार करून मनुष्यबळाचा कौशल्य विकास होणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा समन्वय साधून औद्योगिक आस्थापने आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) योग्य समन्वय प्रस्थापित केल्यास जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com