स्मार्ट सिटी कंपनीने जबाबदारी झटकली

स्मार्ट सिटी कंपनीने जबाबदारी झटकली
Published on: 
टूडे साठी --------- स्वयंचलित दरवाजांच्या संचालनासाठी मनुष्यबळ द्या स्मार्टसिटी कंपनीची महापालिकेला सूचना सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ : गोदावरी नदीला पुर आल्यास अहिल्यादेवी होळकर पुलाखाली स्मार्टसिटी कंपनीने तयार केलेल्या मेकॅनिकल गेटचे संचालन महापालिकेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असताना, या कामासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना स्मार्टसिटी कंपनीने महापालिकेला केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. सध्या संबंधित ठेकेदारामार्फत संचलन केले जात आहे. ठेकेदाराकडून संचलन काढून महापालिकेच्या माथी काम मारले जात आहे. सध्या मॅकेनिकल गेटच्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांसोबत समन्वयासाठी महापालिकेनेही संपर्क अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करावेत, जेणेकरून भविष्यातील संचलन अधिक नियोजनबद्ध पद्धतीने होईल, असे कंपनीने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. अहिल्यादेवी होळकर पुलाखाली सुमारे २६ कोटी रुपये खर्चून हे मेकॅनिकल गेट बसविले आहे. करारानुसार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पहिली चाचणी आणि त्यानंतर तीन वर्षे देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीची आहे. दरम्यान, नदी व बंधाऱ्याची मालकी जलसंपदा विभागाकडे असल्याने या विभागाकडे संचलन आवश्‍यक आहे. तरीही हा प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी स्मार्टसिटी कंपनीने महापालिकेला लेखी ऑपरेशन प्रोटोकॉल तयार करण्याचीही सूचना केली आहे. ---------चौकट जबाबदारी झटकली भविष्यातील गेट ऑपरेशन आणि पाणी व्यवस्थापन अधिक सुरक्षित आणि सुरळीत व्हावे, यासाठी सक्षम विभागाकडून स्पष्ट लेखी सूचना किंवा प्रोटोकॉल निश्चित करणे आवश्यक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. तसेच, लेखी सूचना प्राप्त न झाल्यास पाण्याच्या प्रवाहाचे व्यवस्थापन, पातळीतील बदल किंवा गेटच्या उघडझापीमुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीबाबत कंपनी जबाबदार राहणार नसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रावर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. ------------------------
Marathi News Esakal
www.esakal.com