Smart City News : शहरातील स्मार्ट पार्किंग प्रकल्प सुरू होण्याचे संकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smart Parking

Smart City News : शहरातील स्मार्ट पार्किंग प्रकल्प सुरू होण्याचे संकेत

नाशिक : स्मार्टसिटी कंपनीकडून शहरात ३३ पार्किंगचे स्लॉट उभारण्यात आले आहे. यातील काही स्लॉट सुरू करण्यासाठी ट्रायजेन कंपनीने पुढाकार घेतला असून, त्यासाठी अटी व शर्ती ठेवल्या आहे. त्या अटी व शर्तीवर मंगळवारी (ता. २२) चर्चा होणार असून, त्यातून निष्कर्ष निघाल्यास जवळपास पंधरा पार्किंग स्लॉट सुरू होण्याचा अंदाज आहे. (Smart City News Signs of smart parking project in city Nashik News)

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

हेही वाचा: Nashik News : पाण्यासाठी मोहनच्या 20 वर्षाच्या लढ्याला यश; डोंगरपाड्यास धरणातून योजना

स्मार्टसिटी कंपनीकडून शहरात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर ३३ ठिकाणी पार्किंग स्लॉट तयार केले. पार्किंग स्लॉट व्यवस्थापन, तसेच देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी ट्रायजेन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे सोपविण्यात आली. कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने कंपनीच्या दृष्टीने व्यवहार तोट्यात गेल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. या निष्कर्षाच्या अनुषंगाने कंपनीकडून पार्किंग स्लॉट पुन्हा सुरू करण्यासाठी दर वाढवून मागण्यात आले.

त्याचबरोबर कंपनीने १८ कोटी रुपयांची या प्रकल्पात गुंतवणूक केल्याने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या सतरा लाखांच्या रॉयल्टीत सूट देण्याची मागणी केली. दुचाकीसाठी पाचऐवजी १५ रुपये, तर चारचाकीसाठी प्रतितास दहा रुपयांऐवजी ३० रुपये शुल्क वाढ द्यावी, अशी मागणी केली होती. शहरातील पार्किंगची समस्या लक्षात घेता महापालिकेकडून रॉयल्टीत सूट देण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र, या विषयावर अद्यापपर्यंत बैठक झाली नव्हती. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मंगळवारी बैठक बोलावली आहे.

हेही वाचा: Measles Disease : शहरात गोवरची टकटक..!; 4 संशयित बाधितांचे नमुने Haffkine Labकडे

टॅग्स :NashikParkingWork Start