NSK26H32960--NSK26H32959
वीजपुरवठा खंडीत झाल्याने अंधारात गेलेली गावे.
-----------------
स्मार्ट मीटरमुळे गावे लगेच अंधारात!
--------------
थकबाकी न भरल्याने पथदीवे बंद ः सरपंच सेवा महासंघ आक्रमक; तातडीच्या उपाययोजनेची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१८ : ग्रामपंचायतींमध्ये स्मार्ट मीटर बसवल्याने थकीत वीजबिलाचा भरणा केल्याशिवाय वीजपुरवठा सुरु होत नसल्यामुळे ग्रामपंचायतींना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. गावातील बंद पथदिव्यांवरून सरपंच सेवा महासंघ आक्रमक झाला असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
-------------
गावातील पथदिव्यांसाठी स्मार्ट वीजमीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, वीजबिलांची थकबाकी आणि वीजपुरवठ्याच्या प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे पथदिवे बंद पडत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. अनेक ग्रामपंचायतींकडे लाखो रुपयांची वीजबिले थकीत असल्याचे सांगितले जात असताना, गेल्या तीन ते चार दिवसांपासून विविध गावांमध्ये पथदिवे बंद असल्याचे चित्र आहे. ऐन सणासुदीच्या काळात गावातील रस्ते, चौक आणि अंतर्गत मार्ग अंधारात बुडाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
१६-१
बिबट्याची भीती, चोरीचे संकट
ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर, चोरीच्या घटनांची भीती आणि रात्रीच्या वेळी सुरक्षित वावराची चिंता आधीच कायम आहे. त्यात पथदिवे बंद झाल्याने संकट अधिक गडद झाले आहे. रात्री कामावरून घरी परतणारे कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. रस्त्यांवर प्रकाश नसल्याने अपघात अथवा अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली मूलभूत सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
---------------
कोट
ऐन सणासुदीच्या काळात गावोगावी पथदिवे बंद होऊन नागरिकांना अंधारात राहावे लागत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. शासन आणि महावितरणने आपापसांतील वाद बाजूला ठेवून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. बंद पथदिवे तातडीने सुरू करून स्मार्ट मीटर आणि वीजबिलांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढा.
- देवेंद्र काजळे, नाशिक जिल्हा संघटक, सरपंच सेवा महासंघ, महाराष्ट्र राज्य
...
वीजबिलांच्या वादाचा फटका सामान्य ग्रामस्थांना बसता कामा नये. गावातील रस्त्यांवर अंधार असल्याने महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. संबंधित प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन पथदिवे सुरू करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी.
- नितीन गवळी, माजी चेअरमन, नारायण टेंभी