नाशिक- स्मार्टसिटी कंपनी मिशनची मुदत मार्चअखेर संपुष्टात आली असून, नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीला मिशन अंतर्गत नवीन प्रकल्प हाती घेता येणार नाही. परंतु कंपनीने प्रकल्प व्यवस्थापन तसेच सिंहस्थाचे कामे करण्याची तयारी दर्शविली असून महापालिका हद्दीबाहेरदेखील नगरपालिका स्तरावर कामे सुरु केली आहे.