esakal | बाळासाहेब ठाकरे यांचे 'या' स्मार्ट प्रकल्पास नाव!

बोलून बातमी शोधा

balasaheb thakare.jpg

प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अधिपत्याखाली 37 अस्था यी पदांसह प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज्यस्तरावरून प्रकल्पाचे संनियंत्रण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे 'या' स्मार्ट प्रकल्पास नाव!
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : जागतिक बॅंक अर्थसहाय्यित महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राज्यात राबविण्यात येणार आहे. त्यास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय कृषी मंत्रालयाने घेतला आहे. हा प्रकल्प आता 'बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प' या नावाने राबविण्यात येईल. 

जागतिक बॅंकेकडून 210 दशलक्ष डॉलर्स इतके कर्ज घेण्यात येणार

प्रकल्पांतर्गत 300 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच दोन हजार 100 कोटींची गुंतवणूक अपेक्षि त आहे. प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेकडून 210 दशलक्ष डॉलर्स इतके कर्ज घेण्यात येणा र आहे. प्रकल्पातून राज्यातील विविध पिकांच्या कार्यक्षम मूल्य साखळ्या विकसित करण्यात येणार आहेत. त्यात संघटित शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी, सरकारी योजना-प्रकल्पांच्या माध्यमातून यापूर्वी संघटित केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालावर प्रक्रिया करून तो थेट खासगी उद्योजकांना विक्रीसाठी बाजार जोडणी व्यवस्था करण्या चा सरकारचा मानस आहे. 9 सप्टेंबर 2019 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रकल्पास मान्यता देण्यात आली. त्यासंबंधीचे आदेश 11 सप्टेंबर 2019 ला जारी झाले. तसेच, संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. 15 जानेवारी 2020 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकी त सप्टेंबरमधील मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देण्यात आली आहे. 

हेही वाचा > PHOTO : कटला, सुरमई, पापलेट, वाम...अरे वाह! 'इथं' तर माशांची मेजवानीच!...पण, कोरोना?

 प्रकल्प कक्ष स्थापन 

प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अधिपत्याखाली 37 अस्था यी पदांसह प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज्यस्तरा वरून प्रकल्पाचे संनियंत्रण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. शिवाय प्रकल्प व्यवस्थापन कक्षासाठी उच्चस्तर सचिव समितीच्या मान्यतेने 37 अस्थायी पदांची निर्मिती करण्यात आली आहे.  

हेही वाचा > म्यानातून उसळे तलवारीची पात!...13 फुटी भव्य 'तलवार' वेधतेय नाशिककरांचे लक्ष...