जुने नाशिक- अशोक स्तंभ ते मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) सिग्नलपर्यंतच्या स्मार्ट रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाढलेले गवत, लोखंडी जाळ्यांची मोडतोड यामुळे स्मार्ट रस्त्याला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे मुख्य शासकीय कार्यालयाच्या मार्गावरील आणि शहरातील रोल मॉडेल असलेल्या रस्त्याच्या दुभाजकांची अशा प्रकारची दुरवस्था होऊनही महापालिका आणि स्मार्टसिटी विभाग डोळेझाक करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.